कोणतीही घटना घडली की निष्कर्षावर येण्याची घाणेरडी सवय आपल्याला लागलेली आहे. आपली माध्यमेसुद्धा पूर्वग्रह दुषित आहेत किंबहुना त्यांचा एक रंगीत चष्माच आहे आणि त्यातूनच ते सगळ्या घटनांकडे पाहतात आणि त्याच रंगाने सगळ्या घटना रंगवतात. आणि सोशल मिडियासुद्धा या पूर्वग्रहापासून मुक्त कसा राहील? तिकडेसुद्धा ही लागण पोहचलीच. खालची दोन उदाहरणं अगदी बोलकी आहेत.
उदाहरण एक: जावखेडा हत्याकांड
मागच्या ऑक्टोबर महिन्यात नगर जिल्ह्यातल्या जावखेडा इथे एका दलित कुटुंबातल्या तीन जणांची हत्या झाली आणि एका सुरात मिडिया आणि तथाकथित पुरोगामी यांनी ओरडायला सुरुवात केली की यामागे (तथाकथित) उच्चवर्णीयांचा हात आहे. म्हणजे मागचा पुढचा विचार न करता सगळ्यांनी जणू हे गृहीतच धरलं होतं की यामागे नक्कीच उच्चवर्णीयांचा हात असणार. आणि नंतर तपासात जे पुढे आलं ते य गृहितकाला फाटा देणारं होतं. या हत्याकांडात दलित हा शब्द अधोरेखित करण्यात आला होता. केवळ याच नाही तर दलितांशी निगडीत कोणत्याही घटनेत दलित हा शब्द अधोरेखितच असतो आणि दलित हेच नेहमी पिडीत आणि सवर्ण हेच गुन्हेगार हे साधारण गृहीतकच आहे नाही का. म्हणजे दलितांचा कैवार घेतल्याशिवाय तुम्ही पुरोगामी कसे होणार ना? त्यामुळे मग करा दलितांना अधोरेखित. मग जेव्हा एखाद्या दालीताचा खून होतो, किंवा एखाद्या दलित महिलेवर बलात्कार होतो तेव्हा हे गृहीतक आपोआपच लागू केलं जातं आणि पुढची सगळी सिद्धता याच गृहितकाभोवती फिरते. मग सगळे सवर्णांना, त्यांच्या परंपरांना, त्यांच्या रूढींना अगदी त्यांच्या धर्मालासुद्धा वाट्टेल ती दुषणे देऊन मोकळे होतात. एखाद्या समाजावर पिढ्यानपिढ्या झालेला अन्याय दूर करण्यासाठी आज दुसऱ्या समाजावर अन्याय करावाच लागणार, नाही का? त्याशिवाय समाजाची पापं कशी धुतली जाणार, नाही का?
उदाहरण दोन
मागे रोहतकच्या दोन बहिणींचा एक व्हिडीओ मिडीयाने अक्षरशः उचलून धरला. त्यात त्या दोघीजणी एक की दोन मुलांना पट्ट्याने मारत असल्याचं चित्रण होतं. सोशल मिडियावरसुद्धा त्या व्हिडीओला कित्येक शेअर्स आणि लाईक्स मिळाले. त्यानंतर त्याची दुसरी बाजू बाहेर आली तेव्हा आणि आता असं दिसतंय कि यात त्या बिचाऱ्या मुलांचा काहीच दोष नव्हता. इथेही एक गृहीतक आपल्याला प्रकर्षाने पाहायला मिळतं ते असं की जेव्हा एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यात वाद असतो तेव्हा गुन्हा हा पुरुषाचाच असतो. इथेही तेच… स्त्रीवाद म्हणजे पुरोगामीपणा अशी अजून एक व्याख्या झाली आहे ना आज आणि आपण कसे आणि किती पुरोगामी हे दाखवण्याची एक स्पर्धा सगळीकडेच दिसत आहे.
वरच्या दोन उदाहरणांवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे ती अशी की आपण, आपला अख्खा समाज, आपल्या सगळ्या यंत्रणा हे पूर्वग्रहाने पछाडलेले आहेत. म्हणजे पहा की दलित आणि सवर्ण यांत सवर्णच दोषी असणार, स्त्री आणि पुरुष यांत पुरुषच दोषी असणार, गरीब आणि श्रीमंत यांत श्रीमंतांनाच मज चढलेला असणार, सायकलस्वार आणि करचालक यांत कारचालकच दोषी असणार, नाही का? अगदी याच गृहीतकांवर आपले कायदे सुद्धा आधारित आहेत. शेवटी दुसरी बाजू इथे पहायचीय कुणाला? एका आणि एकाच बाजूचे आम्ही पुरस्कर्ते आणि तेच आमच्या सोयीचं आहे ना. त्याशिवाय आम्हांला पुरोगामी कोण म्हणणार?