पृष्ठे

सोमवार, २३ जून, २०१४

अज्ञाताच्या शोधात

इंटरनेट असलं की पाच मिनिटेसुद्धा ब्राउजरकडे फिरकल्याशिवाय जात नाहीत . दर दोन तीन मिनिटांत एकदातरी ई मेल किंवा फेसबुक किंवा उगाच नवीन tab ओपन करून काहीतरी शोधणं चाललेलं असतं. नवीन मेल आला असेल का, फेसबुकवर कुणाचे नवीन अपडेट्स आले असतील का, मीच काही अपडेट्स करू का, अशा एक ना अनेक गोष्टींसाठी आणि बहुतेक वेळा उगाच सवय म्हणून नेटवर जाणं होतं आणि भरपूर वेळ वय जातो. बऱ्याच वेळा असं होतं की काही काम नसताना उगाच आपण ब्राउजर ओपन करतो आणि मग आपण कशाच्या शोधत इकडे आलोत हेच माहिती नसतं किंबहुना आपण अज्ञाताच्या शोधात असतो असंच म्हणावं लागेल. मग ते अज्ञात काहीही असो. काहीतरी अनपेक्षित भेटेल अशी अपेक्षा असते. हे सगळं कळतं हो, पण वळत मात्र नाही. वेळ जायचा तो जातोच.