पृष्ठे

मंगळवार, १ एप्रिल, २०१४

बाकी शून्य -१

प्रिय,
खूप खूप काही सांगायचंय तुला. पण मला जे वाटतंय ते शब्दांत कितपत मांडता येईल माहित नाही. काही विचार, काही गाणी, काही सुगंध, काही आठवणी आपल्याला देहातीत घेऊन जातात असं तुला कधी वाटलंय का? मला ते आताशा वारंवारच वाटायला लागलंय. किंबहुना वर्तमानापासून दूर कुठेही जावंसं वाटतंय. कदाचित आता वर्तमानात मन रमत नाही म्हणून असेल. भविष्याचा वेध घेण्याचा मी प्रयत्न करत नाही कारण त्याची शाश्वती नाही.  काळाबरोबर माणूस किती बदलतो, नाही का? दुःख पर्वताएवढे झेलून माणूस प्रगल्भ होतो का? की अजूनच हळवा होतो? असो. जरा थकवा आला होता म्हणून हा पत्रप्रपंच. थकवा आला कि मग मनसुद्धा उदास होतं, नाही का? तसंच झालंय माझं अन त्यात ही अंधारी रात्र. काळोख दिसतोय सगळीकडेच. पण मी अजून आशा सोडली नाही हेच तुला सांगायचंय. लढण्याची उमेद अजून मनात आहे. शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करायची माझी तयारी आहे. त्या सूर्योदयाच्या एका सोनेरी क्षणासाठी ही रात्रच काय अशी अंधारलेली युगेयुगे संघर्ष करायची माझी तयारी आहे. फक्त तू माझ्या पाठीशी राहा म्हणजे मला लढताना एकटं वाटणार नाही. 

बाकी शून्य 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा