माणूस कायम सुखाच्या शोधात असतो. आपली अख्खी हयात तो याच एका गोष्टीच्या मागे फिरत असतो. तो कधी आपल्या कामात सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, कधी यशामध्ये, कधी आपल्या कुटुंबियांच्या सहवासात. सुख हे असं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आणि वेगवेगळ्या क्षणांमध्ये विखुरलेलं असतं. ते पाण्यासारखं प्रवाही असतं. ते एकगठ्ठा कधीच हाती लागत नाही. कितीही तहान लागलेली असली तरी आपल्याला एकेक घोटच पाणी प्यावं लागतं तसंच सुखाचं आहे. ते जसं येईल तसं थोडं थोडंच उपभोगीत जावं यातच त्याची गोडी असते. त्याला घट्ट धरून ठेवण्याचा अट्टाहास नसावा.
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
गुरुवार, ९ जून, २०२२
रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२
भाषा
भाषा जशी काही मैलांवर बदलते तशी ती काही काळानंतरही बदलत जाते. मराठीच काय सर्वच भारतीय भाषा अतिशय समृद्ध आहेत आणि काळाच्या ओघात त्यांच्यामध्ये बदल होणार आणि झालेही पाहिजे. बदलाला विरोध करणारी कोणतीच भाषा दीर्घकाळ टिकू शकत नाही. भाषेची शुद्धता ही कुणाची मक्तेदारी नाही. भाषेला राजाश्रय जरूर असावा पण राजकीय अट्टाहासाच्या जाळ्यात ती अडकता कामा नये. भाषा टिकवण्याचं , वाढवण्याचं काम हे तुम्हा आम्हा सारखे सामान्य लोकच करीत असतात
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)