काहीतरी लिहावं असं बऱ्याच दिवसांपासून मनात आहे. तसा अनेक वेळा प्रयत्नही केलाय आणि कही वेळा तो यशस्वीही झालाय. तूर्त हे लेखन माझ्या पुरतंच मर्यादित आहे. म्हणजे त्याचा लेखक आणि वाचकही मीच आहे.
बऱ्याच वेळा असं होतं की वही आणि पेन घेउन लिहायला बसलं की ज्याबद्दल लिहावं असे अनेक विचार डोक्यात एकच गर्दी करतात आणि मग काय लिहावं तेच नेमकं कळत नाही. बरं एखादा विषय घेउन लिहावं तर क्रम कसा ठेवावा हा यक्षप्रश्न्न. म्हणून मग ठरवलंच की नियमित कही तरी लिहायचंच. आणि त्यासाठी ब्लॉगपेक्षा उत्तम पर्याय दुसरा काय असणार?