पृष्ठे

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०१४

मी काही लई भारी लिहितो असा दावा करत नाही पण कधी कधी असं होतं कि मी माझाच ब्लॉग जेव्हा वाचतो तेव्हा एखादी चांगली पोस्ट वाचून वाटतं कि 'अरेच्चा, हे मी लिहिलंय?  कसं काय सुचलं बुवा आपल्याला हे?' पण असं जेव्हा वाटतं तेव्हा थोडासा आनंदही होतोच. आणि का नाही होणार? आपले विचार नेमक्या शब्दांमध्ये गुंफता येणं हे आनंददायीच असतं. ते नेहमीच जमतं असं नाही. कधी कधी शब्दांची ओढाताणही करावी लागते. असे ओढाताण करून लिहिलेले कित्येक ड्राफ्ट  ब्लॉगवर पडून आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा