आज 'शितू' वाचून कम्प्लीट झाली. वाचताना 'काकस्पर्श'मधली दृष्यं डोळ्यासमोर यायची. दोन्ही कथा खूप भिन्न असल्या तरी पार्श्वभूमी सेम आहे. म्हणजे कोकण, बाल विधवा वगैरे. वाचत असताना एवढा involve झालो होतो कि कित्येक वेळा डोळ्यात अश्रू तरळायचे आणि मग थोडा वेळ वाचणं थांबवावं लागायचं. राव आता आपला मूड भयंकर सेंटी झालाय. त्यामुळे आपल्या प्लेलिस्ट मध्ये आज फक्त रडगाणेच वाजताहेत. मनातसुद्धा काही ओल्याचिंब, सेंटी सेंटी आठवणी प्ले होतायत(हे म्हणजे लय भारी, नाही का?)
'शितू' तर ओहोटीच्या दर्याने आपल्या पोटी घेतली पण 'विसू' बिचारा धड जगातही नाही अन धड मरतही नाही. त्याचं शरीर आणि मन यांच्यात मरणासाठी द्वंद्व चाललेलं. कधी शरीर मरायला तयार होतं तर मन काच खातं. कधी मन निग्रह करून मरणसिद्ध होतं तर शरीराला जगावंसं वाटतं. शितूचा निःश्वास त्या दर्याकिनारी हवेत कुठेतरी घुटमळत असेल या वेड्या आशेवर तो जगतोय. 'शितू! ए शितू ग!' असं ओरडत हिंडतोय.

