व्यक्त होणं, व्हावसं वाटणं ही माणसाची गरज आहे. आपली सुख दुःखं, आपल्या व्यथा, आपल्या चिंता, आपल्या अचिव्हमेंट्स इतरांसोबत शेअर करावसं वाटणं स्वाभाविक आहे. पण मनातलं सगळंच कुठं व्यक्त करता येतं. काही गोष्टी शब्दांअभावी मनातच राहतात तर काही शब्द गवसूनसुद्धा बाहेर पडत नाहीत. माणसानं आपलं मन रितं केलं पाहिजे असं कुणी कितीही म्हटलं तरीही ते शक्य आहे का? खरं तर व्यक्त न करता येण्यासारख्या कित्येक गोष्टींनी मन भरून गेलेलं असतं. आणि ते रितं करू म्हटल्याने काही रितं होत नाही. मुख्य म्हणजे कुणाकडे व्यक्त व्हायचं ? हे जग, आपल्या अवती भवतीची माणसं किती उथळ आहेत हे पाहिल्यावर तर मनातल्या गोष्टी मनातच राहिलेल्या बऱ्या असं वाटतं. इतरांनी आपल्याला समजून घेतल्यवर मिळणाऱ्या सुखापेक्षा त्यांनी गैरसमज करून घेतल्यावर वाटणारं दुःख भयंकर असतं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा