मागच्या पाच दहा वर्षात 'जय भवानी जय शिवाजी'ची जागा 'जय जिजाऊ जय शिवराय' या घोषणेने घेतली. भवानी मातेला अतिशय शिताफीने बाजूला केलं गेलंय. गुढी पाडव्याला गुढ्या उभारणं सोडून आपण पताका उभारू लागलो. बहुजन प्रतिपालक शिवाजी म्हणताना गोब्राम्हण प्रतिपालक शिवाजी महाराज कुठेतरी हरवत गेले. गोब्राम्हण प्रतिपालक शिवाजी महाराजांनासुद्धा भवानी मातेप्रमाणेच पद्धतशीरपणे बाजूला सरण्यात आलंय कारण ते सोयीचं नाही. देव्हाऱ्यातून देवी देवता जाऊन शिवाजी महाराज आणि जिजाऊंनी त्यांची जागा घेतली. जिजाऊ आणि शिवराय हे आम्हांला सर्वदा वंदनीयच. पण आम्ही त्यांना विभूती करून त्यांचा माणूस असण्याचा अधिकार नाकारला आहे. याउपर आपली प्रतीके अशी बाजूला सारून आम्ही आपल्याच मुळावर घाव घालत आहोत. बदल वगैरे मान्य आहे हो पण तो स्वयंस्फूर्त असायला हवा. पद्धतशीरपणे केली जातात ती कारस्थाने.
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८
रविवार, २१ जानेवारी, २०१८
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
