पृष्ठे

रविवार, २ मार्च, २०१४

हल्ली कुणालाही फोन केला किंवा कुणाचाही फोन आला कि एकच प्रश्न : मग कुठपर्यंत आलं MS? कधी संपणार? यात त्यांचा हेतू चांगलाच असतो. पण खरं तर या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडेच नाहीत. काय उत्तर देणार मी? बरं ते माझ्या हातात असतं तर सांगितलंही असतं की अमुक अमुक दिवशी होईल. इथे मलाच माहित नाही माझं MS कुठपर्यंत आलंय आणि कधी पूर्ण होणार ते.  हा प्रश्न ऐकून मला जबर टेन्शन येतं. म्हणजे कुणीतरी मानगुटीवर बसून विचारत असल्यासारखं वाटतं. मागे एवढे दिवे लावलेत त्यामुळे आधीच अपराधी वाटतंय आणि त्यात हे असले अवघड प्रश्न…! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा