दिड वाजलाय रात्रीचा आणि अजून मी जागाच. पण हे रोजचंच झालंय आता जवळपास. 'वीणा इन व्हिएन्ना' ऐकतोय. सुचवण्यासाठी थ्यांक्स टू विशाल. झोपावं असं मनात आहे पण हे क्षण असेच धरून ठेवण्याचा एक प्रयत्न. रात्री नाऊनंतर टाईम एकदम accelerate होतो. हा हा म्हणता मध्यरात्र उलटून जाते. पण कानात इअरफोन्स आणि मनात विचार असले की झोप कुठून येणार? आणि त्यात भरीस भर म्हणून पाऊस पडून थंड झालेलं वातावरण. ही रात्र अशीच चालत राहिली तर कुणाचं काय बिघडतं? या क्षणी जगात काय काय घडत असेल बरं? उद्या ल्याबमध्ये भयंकर झोप येणार.
माणूस अजब गोष्ट आहे ना? आपल्याभोवती आपल्याच विचारांचं जग निर्माण करतो आणि मग भोवतीच्या खऱ्या जगात त्याचं प्रतिबिंब शोधण्याचा प्रयत्न करतो. विचारही किती! क्षणक्षणाला एकेक उगवतात. पाण्यावर उठणाऱ्या तारांगांसारखे. नुसती हालचाल चाललेली असते मनाची. झोपेत तरी कुठे शांत असतं ते? स्वप्नं पडतातच… इच्छा असो वा नसो आणि मग त्यांत रमायला लागलं की सकाळ होते. मग स्वप्नात काय पाहिलं हेही आठवत नाही. लिहिण्यात तोचतोचपणा आल्यासारखं वाटतंय. पण करणार काय माणूस तोच आहे ना राव. संगितासारखा आनंद जगात इतर कुठे आहे? म्हणूनच तर काहीजणांना हे विश्व संगीतातून निर्माण झाल्यासारखं वाटत असावं. आपल्याला काय वाटतं हे आपल्या मूड्सवर खूपच अवलंबून असतं. या पोस्टला टायटल काय द्यावं हाही एक प्रश्नच आहे. randomला मराठीत काय म्हणतात काय माहित राव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा