पृष्ठे

रविवार, २१ जानेवारी, २०१८

कधी कधी सुख आणि दुःख एकाच वेळी आयुष्यावर थाप देतात. किती घालमेल होते अशा वेळी. दुःखाला कवटाळून रडावं की सुखाला मिठी मारावी कळतच नाही, हो ना?  
अविश्वासाच्या वनात गैरसमज वणव्यासारखे पसरतात आणि विश्वासाची वंशवेल भस्मसात करून टाकतात. कुणी गैरसमजांना किती थारा द्यायचा हा शेवटी  ज्याचा त्याचा प्रश्न.