माणसानं आशावादी जरूर असावं. कसल्याही कठीण प्रसंगी प्रचंड आशा उराशी बाळगावी. पण ती आशा आपलं जगणं तोलून धरण्याएवढीच असावी. तिच्या बळावर स्वप्नांचे इमले रचण्याचा प्रयत्न करू नये. कारण ते इमले जेव्हा कोसळतात तेव्हा पायाखालची जमीनसुद्धा सरकते आणि साधं उभं राहायलाही आधार उरत नाही.
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
मंगळवार, ५ मे, २०१५
सोमवार, ४ मे, २०१५
एक स्वप्न
मरणाच्या दरीत कोसळताना
जगण्याचा पुन्हा मोह झाला
डोळ्यांदेखत माझ्या अन
चक्काचूर हा देह झाला
त्या नसण्यातही एक असणं होतं
जसं जगताना असून नसणं होतं
पण रात्र सरली स्वप्न भंगून
अस्तित्व पुन्हा मूर्त झालं
असण्याचा उन्माद घेऊन
जगणं पुन्हा धूर्त झालं
जगण्याचा पुन्हा मोह झाला
डोळ्यांदेखत माझ्या अन
चक्काचूर हा देह झाला
त्या नसण्यातही एक असणं होतं
जसं जगताना असून नसणं होतं
पण रात्र सरली स्वप्न भंगून
अस्तित्व पुन्हा मूर्त झालं
असण्याचा उन्माद घेऊन
जगणं पुन्हा धूर्त झालं
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)