पृष्ठे

बुधवार, १६ एप्रिल, २०१४

बाकी शून्य - २

प्रिय, 

कधी कधी जेव्हा आपण अगदी निराश अगदी उदास असतो तेव्हा एखादा चित्रपट, एखादं गाणं, एखादी सुंदर आठवण, एखादा फोटो आपल्याला एकदम ताजंतवानं करून टाकतात. एखादा विचार आपल्यामध्ये उमेद निर्माण करून जातो. सगळंच बदलल्यासारखं वाटतं. ढग जाऊन अगदी स्वच्छ सूर्यप्रकाश पडल्यावर जो आनंद होतो तसंच काहीसं वाटतं. मी आता तसंच काहीतरी अनुभवत आहे. संध्याकाळी खूप डिप्रेस व्हायला झालं होतं पण मग काही गाणी ऐकली आणि कसे कुठून अगदी सकारात्मक विचार डोक्यात उगवायला लागले कुणास ठाऊक सगळा आसमंत उत्साहाने भरून गेला. आपण आहोत, हे जग आहे ही जाणीवच एकदम एक्सायटिंग आहे, नाही का? हे असं का होतं? 

असो. अजून एक गोष्ट म्हणजे उद्या घरी जायचंय. त्याचा आनंदही आहे. प्रवासाचा आनंद आहे. मला प्रवास भयंकर आवडतो. पण उद्यापेक्षा आजचा दिवस विशेष. कारण आजच्या दिवसाला उद्या आहे ज्याच्या गर्भात आनंद दडलाय. पण उद्यासाठी उमेद कुठून आणावी? कारण परवा काय हे अनिश्चित आहे. अनिश्चिततेच्या गर्भात काय आहे कुणास ठाऊक? पण मला त्याची पर्वा नाही आता. आता मी खूष आहे. 

बाकी शून्य 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा