सगळी माणसं सारखीच आहेत यात काही वादच नाही , पण हे हिंदूंसोबतच इतरांनीही शिकायला हवंच. विशेषतः ज्यांना आपलाच धर्म श्रेष्ठ आणि एकमेव सत्य वाटतो त्यांनी. आणि राहता राहिला प्रश्न हिंदू या शब्दाचा. तर त्याचं मूळ काहीही असलं तरी आता हिंदू ही आपली ओळख झाली आहे. हिंदू शब्द नसता तरीही या धर्माला इतर कुठल्या तरी नावाने ओळखले गेले असतेच. आणि हिंदू नावाखाली जर वेगवेगळे भारतीय संप्रदाय एकवटले नसते तर आज त्यांचेच कित्येक धर्म झाले असते. कुणी शैव, कुणी वैष्णव, कुणी आणखी काही. मुळात "एकम सात विप्राः बहुधा वदन्ति" हीच हिंदू धर्माची विचारसारणी राहिलेली आहे नेहमीच. तुम्ही कोणा एका देवाला भजता किंवा कोण्या एका प्रेषिताला मानता म्हणून तुम्ही हिंदू अशी हिंदू धर्माची ओळख नाही हाच हिंदू धर्माचा मोठेपणा नाही का वाटत? मी हिंदू असूनसुद्धा नास्तिक असू शकतो ही हिंदू असण्यातली चैन नाही का? Authoritarian नसणं हे हिंदू धर्माचं बलस्थान नाही का वाटत? द्वैत अद्वैत, विशिष्ठाद्वैत यांच्यासोबत चार्वाकनीतीलाही फक्त हिंदू धर्मातच स्थान मिळू शकतं. मला वाटतं हिंदू धर्मात जर काही वाईट असेल तर ते एकच - जातीभेद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा