तसं सगळं अलबेल आहे
म्हटलं तर सगळं सेटल आहेतरीही एक हुरहूर आहे
काही एक राहून गेल्याची
आणि जराशी खंतही आहे
क्षण काहीसे वाहून गेल्याची
बाकी सगळं अलबेल आहे
जवळपास सगळं सेटल आहे
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।