कोव्हीड-१९ च्या प्रसाराने सगळ्या जगाला स्तब्ध केले आहे. जीवित हानी तर झालीच पण भरून येण्यास कित्येक वर्षे लागतील असे आर्थिक नुकसानही झाले आहे आणि अजून होत आहे. पण यानिमित्ताने आपणाला कित्येक धडेही मिळाले ज्यांच्यावर आपल्या देशाची आणि इतरही देशांची पुढची वाटचाल अवलंबून असणार आहे. आपल्या प्रायॉरिटीज पुन्हा डिफाइन करण्याची वेळ आली आहे. उदाहरणार्थ, व्यक्तिस्वातंत्र्याचा बालेकिल्ला असलेल्या युरोपमध्ये आज व्यक्तिस्वातंत्र्य धाब्यावर बसवण्याची वेळ आलेली आहे आणि तिथे कलेक्टिव्ह वेल्फेअरला जास्त महत्त्वं प्राप्त झालेलं आपण पाहत आहोत. मुद्दा केवळ व्यक्तिस्वातंत्र्याचाच आहे असं नाही किंवा व्यक्तिस्वातंत्र्य वाईट आहे असंही नाही तर मागची काही वर्षे विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर जी मूल्ये, जी तत्त्वे कित्येक देशांनी आपापल्या समाजात रुजवली होती जी वर्ल्ड ऑर्डर प्रस्थापित झाली होती त्याचा पायाच मुळापासून हादरून गेला आहे. ग्लोबलायझेशन जितकं गोंडस आणि आकर्षक दिसतं तितकंच ते भयावहसुद्धा आहे याची जाणीव झाली आहे. कोणत्याही देशाने आरोग्य, संरक्षण, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान अशा बाबतीत स्वयंपूर्ण होणं किती आवश्यक आहे हेही अधोरेखित झालं आहे आणि होत आहे. एक माणूस म्हणूनच नव्हे तर एक समाज आणि एक देश म्हणून सवर्वांवरच आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे.
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
गुरुवार, ९ एप्रिल, २०२०
शनिवार, ४ एप्रिल, २०२०
आकडे
आपण, तथाकथित सुशिक्षित लोक, आकड्यांचे फार वेडे असतो, नाही का? आकडे पहिले की त्यावर विश्वास ठेवण्याकडेच आपला कल असतो. कुणी त्यांच्या विधानाच्या समर्थनार्थ काही आकडे आणि काही आऊट ऑफ कॉन्टेक्सट वाक्ये आपल्या तोंडावर फेकून मारली की अगदी कोणत्याही गोष्टीवर आपण विश्वास ठेवायला तयार होतो. पण आकडे हे फार फसवे असू शकतात कारण त्या आकड्यांची सत्यता कळण्याचा कुठलाच मार्ग आपल्याकडे नसतो आणि आपण तशी तसदीही घेऊ इच्छित नसतो. कुणास ठाऊक आपल्यापर्यंत आलेले मेसेजेस आणि त्यातले आकडे हे कुणाच्या तरी खोडसाळ डोक्यातच उगवलेले असू शकतात. विशेषतः सोशल मीडियाच्या काळात तर असले आकड्यांनी भरलेले मेसेजेस पसरवणे काही फार अवघड नाही आणि त्यांना मिळणार सपोर्ट पण काही कमी नाही. आपल्या सोयीचा कसलाही मेसेज लोक अगदी विचार न करता पुढे फॉरवर्ड करून देतात. या असल्या मेसेजेसचंसुद्धा एपिडेमिक्ससारखं असतं. एकदा ते बाहेर पडले की पसरत राहतात आणि लोकांचा बुद्धिभेद करत राहतात आणि आपल्याच कोशात जगणाऱ्या बऱ्याच लोकांना आपला बुद्धिभेद झाल्याचं आयुष्यभरही समजत नाही.
सरोजकुमार भोसले
दिवे
(चेतावणी: मी खाली जे लिहिलंय ते माझं मत आहे. इतरांची मते वेगळी असू शकतात. हे लिहावं लागतंय कारण मतभेदांना लोक खूप पर्सनली घेतात. जरा वेगळं मत व्यक्त केलं की व्यक्तिगत विरोध असल्यासारखं लोकांना वाटतं. असो)
दिवे लावायचे की नाही यावर सोशल मीडियावर बरेच वाद प्रतिवाद चालू आहेत. प्रश्न असा आहे दिवे लावल्याने कोरोनाचा नायनाट होणार आहे का? तर अजिबात नाही. याचा विज्ञानाशी काडीमात्र संबंध नाही. पण जे लोक विज्ञानवादी म्हणून दिवे लावणार नाही असं छाती ठोकून सांगत आहेत त्यांना विज्ञान कशाशी खातात हे तरी माहित आहे का? (सायंटिफिक टेम्परचा ढोल बडवणाऱ्यांना सायन्समधला ओ की ठो सुद्धा माहिती नसतो असं माझं ठाम मत आहे. ज्यांना विज्ञान माहिती आहे ते असल्या भानगडीत पडतच नाहीत. असो) दिवे लावणे हे प्रतीकात्मक (सिम्बॉलिक) आहे. त्याचा उद्देश सेलिब्रेशन नव्हे तर आपली एकात्मता दाखवणे होय, आपले मनोबल वाढवणे होय. टाळ्या अथवा थाळ्या वाजवणे हेही प्रतिकात्मकच होते. यातून हाती काय आले हा कदाचित वादाचा मुद्दा होऊ शकतो. त्यावर मते मतांतरे असू शकतात. ज्यांना शंका असेल त्यांनी यात सहभाग घेऊच नये मुळी. दिवे लावा आगर नका लावू नुकसान काही नाही. दुसरी गोष्ट म्हणजे दिवे लावण्यासाठी आवाहन केले म्हणजे आता फक्त दिवेच लावणे हा एककलमी कार्यक्रम आहे असं नाही. त्यामुळे दिवे लावल्याने बाकी अत्यावश्यक निर्णय सरकारने घेतलेच नाही फक्त दिवे लावण्यातच सगळं वेळ व शक्ती खर्च केली असंही काही नाही . राहता राहिला प्रयत्न सरकार काय करीत आहे याचा. तर सगळी राज्य सरकारे, केंद्र सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा आपले काम अगदी चोखपणे करीत आहे. आपल्यापेक्षा त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव नक्कीच कैकपटीने जास्त आहे. निझामुद्दीनमध्ये काय घडलं ते सगळ्या जगाने, निदान भारताने तरी, पाहिलं. ती खरी समस्या आहे. त्यावर कुणी आणि विशेषतः स्वतःला सगळ्या देशाची, डॉक्टरांची, लोकांची काळजी असल्याचं भासवणऱ्या सुजनांनी भाष्य केलेलं कुठल्या ग्रुपवर दिसलं नाही. तिथे एकूणच प्रकरणाला हिंदू मुस्लिम रंग दिला गेल्याचा ढोल वाजवला जातो. याला सिलेक्टिव्ह क्रिटिसिझम असे म्हणतात. आपल्याला हव्या त्याच गोष्टीकडे लक्ष वेधणे आणि आपल्या सोयीच्या नसलेल्या गोष्टींकडे पद्धतशीरपणे डोळेझाक करणे, तिचा उल्लेखही न करणे हा तो प्रकार होय. यातून आपलीच दुटप्पी वृत्ती दिसून येते. बाकी कुणी काय दिवे लावायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न.
-सरोजकुमार भोसले
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)