प्रिय,
असं म्हणतात आपलं दुःख हे आपल्यापुरतंच ठेवावं. हेच केलंय आतापर्यंत. पण मनात एवढं दुःख, एवढ्या वेदना दाटल्यात की ते रितं केल्याशिवाय पुढे येणाऱ्या दुःखांना तोंड देता येणार नाही. मला कुणाची सहानुभूती मुळीच नकोय. फक्त ऐकून घेणारी एक व्यक्ती हवी आहे. तुला कदाचित माझ्या दुःखांची दाहकता जाणवणारही नाही.
आपल्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला तू पहिला आहेस का? मी पहिला आहे. एकदा नाही तर अनेकदा. किंबहुना माझी सगळी स्वप्ने प्रत्येक वेळी धुळीस मिळाली आणि त्या प्रत्येक वेळी मी मोठ्या आशेने पुन्हा उभा राहिलो. संघर्ष करायला. नव्या स्वप्नांना उराशी घेऊन पुन्हा चालत राहिलो. प्रत्येक वेळी. पण सगळं संपलंय आता. निराशेच्या भयाण गुहेत उभा आहे मी . एकटाच वाट चालत उजेडाचा माग घेत इथवर आलो आहे. आता त्राण राहिले नाहीत शरीरात आणि आशाही उरली नाही मनात. तरीही असा निराशेच्या घनघोर अंधारात कित्येक पावले चाललो. पण आता मात्र नाही चालवत. बस्स झालं हे सगळं. नियतीला जे हवंय ते होऊ दे. तिच्यावरच सोपवलंय आता प्रारब्ध. मनगटातला जोर हा असा ओसरतो हे माहित असतं तर एवढा उद्व्याप केलाच नसता. तळहातावरच्या रेषा इतक्या बलदंड असतात हे माहित असतं तर स्वतःच्या वाटा बाहेर शोधण्याऐवजी तळहातावरच्या रेषांनाच वाटा बनवून चाललो असतो.
बाकी शून्य
बाकी शून्य