शाळेत असताना बोर्डावर सुविचार लिहायची जबाबदारी बहुतेक वेळा माझी असायची. तेव्हा फक्त ते सुविचार लिहायचो, त्यांचा अर्थ कळायचा पण त्यांचं महत्त्व नाही कळायचं कारण तेवढं जगच पाहिलं नव्हतं, तेवढा अनुभव गाठीशी नव्हता. पण आता थोडंफार जग पाहिलंय आणि थोडाफार अनुभव गाठीशी आहे तेव्हा काही सुविचारांचा अर्थ खऱ्या अर्थाने उलगडत आहे. खरं तर सुविचार म्हणजे कुणाचे ना कुणाचे अनुभवच नाही का? शब्दांत गोठलेले,थिजलेले . जोपर्यंत अनुभवाची झळ तुम्हांला लागत नाही तोपर्यंत ते तुमच्यासाठी फक्त थिजलेलेच राहणार.
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
शनिवार, ३० ऑगस्ट, २०१४
सुविचार
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा