भविष्यात सगळं काही मस्त, आनंदी-आनंद वगैरे दडलेलं आहे आणि हा वर्तमान तेवढा खडतर असं आपल्याला नेहमी वाटत असतं. आणि एकदा का हा काळ संपला कि मग आयुष्य कसं मजेत जगता येईल या भाबड्या आशेनं आपण हाती असलेला सोनेरी क्षण जगायचं सोडून धावत सुटतो . आणि जेव्हा आपण आपल्या इच्छित क्षणापर्यंत पोहोचतो तेव्हा लक्षात येत कि इथे तर काहीच वेगळं नाही सगळं काही तसंच आहे. उलट काही मोठे प्रश्नही आहेत स्वागत करायला. पण केव्हातरी आपल्या हाती असलेले क्षणही आता आपले राहिलेले नसतात. त्यांच्या आठवणी झालेल्या असतात किंवा त्याही नाही कारण ते आपण जागलेलोच नसतो. त्या क्षणांसोबातच कदाचित इतरही बरंच काही गमावलेलं असतं आपण पण याची जाणीव होण्याइतकीही उसंत घेत नाही आपण. आणि एवढं सगळं होऊनहि आपण परत धावतच राहतो हातचं सोडून पळत्यापाठी. आणि मग कुठल्यातरी क्षणी आपल्या लक्षात येत कि आता आपले इथले सगळेच क्षण संपलेत आणि जगायचं तर राहूनच गेलं. अशा वेळी धावायचं थांबवतो आपण कारण पुढे काहीच नसतं धावण्यासाठी. म्हणजे क्षण तर असतातच पण ते आपले नसतात. मग आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येत कि आयुष्यातल्या त्या सोनेरी क्षणांसोबातच दूर कुठेतरी आपली जिवाभावाची माणसेही हरवली आहेत जी अशा सांजवेळी आपल्यासोबत असायला हवी होती. आणि जी आपल्यासोबत असतात ती त्यांच्या भविष्याचा वेध घेत धावत असतात, जसे आपण धावलो, जगायचं सोडून. पण हा साक्षात्कार व्हायला सगळे क्षण संपायलाच हवेत का? आयुष्यातल्या एक दोन प्रसंगातूनही असं होणार हे कळून येतंच की. तासाच प्रसंग (म्हणजे काही फार भयंकर वगैरे नाही , आपण ज्याला enlightening incidence वगैरे म्हणू तसा) काल घडला. आणि झोपताना विचार करत होतो तेव्हा लक्षात आलं की अरे आपलं हे नेहमी असंच होत आलंय. मग ठरवलं की हातात आलेला प्रत्येक क्षण जागायचा. आयुष्यात आलेली माणसं जपायची. म्हणजे शेवटी आपण आयुष्यातले बरेच क्षण जगलो असं समाधान तरी असेल. आणि हे असं फक्त त्या शेवटच्या क्षणी मिळणाऱ्या समाधानासाठीच करायचं असं नाही. एकदा का आपण प्रत्येक क्षण जगायला लागलो की मग आपण जिच्यासाठी म्हणून धावत होतो ती गोष्ट त्या प्रत्येक क्षणांमध्ये सापडते. आणि मग आपण आपला शेवटचा क्षणही जगतो. तोही अगदी मनसोक्त...........!
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
शनिवार, ३१ मार्च, २०१२
क्षण
भविष्यात सगळं काही मस्त, आनंदी-आनंद वगैरे दडलेलं आहे आणि हा वर्तमान तेवढा खडतर असं आपल्याला नेहमी वाटत असतं. आणि एकदा का हा काळ संपला कि मग आयुष्य कसं मजेत जगता येईल या भाबड्या आशेनं आपण हाती असलेला सोनेरी क्षण जगायचं सोडून धावत सुटतो . आणि जेव्हा आपण आपल्या इच्छित क्षणापर्यंत पोहोचतो तेव्हा लक्षात येत कि इथे तर काहीच वेगळं नाही सगळं काही तसंच आहे. उलट काही मोठे प्रश्नही आहेत स्वागत करायला. पण केव्हातरी आपल्या हाती असलेले क्षणही आता आपले राहिलेले नसतात. त्यांच्या आठवणी झालेल्या असतात किंवा त्याही नाही कारण ते आपण जागलेलोच नसतो. त्या क्षणांसोबातच कदाचित इतरही बरंच काही गमावलेलं असतं आपण पण याची जाणीव होण्याइतकीही उसंत घेत नाही आपण. आणि एवढं सगळं होऊनहि आपण परत धावतच राहतो हातचं सोडून पळत्यापाठी. आणि मग कुठल्यातरी क्षणी आपल्या लक्षात येत कि आता आपले इथले सगळेच क्षण संपलेत आणि जगायचं तर राहूनच गेलं. अशा वेळी धावायचं थांबवतो आपण कारण पुढे काहीच नसतं धावण्यासाठी. म्हणजे क्षण तर असतातच पण ते आपले नसतात. मग आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येत कि आयुष्यातल्या त्या सोनेरी क्षणांसोबातच दूर कुठेतरी आपली जिवाभावाची माणसेही हरवली आहेत जी अशा सांजवेळी आपल्यासोबत असायला हवी होती. आणि जी आपल्यासोबत असतात ती त्यांच्या भविष्याचा वेध घेत धावत असतात, जसे आपण धावलो, जगायचं सोडून. पण हा साक्षात्कार व्हायला सगळे क्षण संपायलाच हवेत का? आयुष्यातल्या एक दोन प्रसंगातूनही असं होणार हे कळून येतंच की. तासाच प्रसंग (म्हणजे काही फार भयंकर वगैरे नाही , आपण ज्याला enlightening incidence वगैरे म्हणू तसा) काल घडला. आणि झोपताना विचार करत होतो तेव्हा लक्षात आलं की अरे आपलं हे नेहमी असंच होत आलंय. मग ठरवलं की हातात आलेला प्रत्येक क्षण जागायचा. आयुष्यात आलेली माणसं जपायची. म्हणजे शेवटी आपण आयुष्यातले बरेच क्षण जगलो असं समाधान तरी असेल. आणि हे असं फक्त त्या शेवटच्या क्षणी मिळणाऱ्या समाधानासाठीच करायचं असं नाही. एकदा का आपण प्रत्येक क्षण जगायला लागलो की मग आपण जिच्यासाठी म्हणून धावत होतो ती गोष्ट त्या प्रत्येक क्षणांमध्ये सापडते. आणि मग आपण आपला शेवटचा क्षणही जगतो. तोही अगदी मनसोक्त...........!
गुरुवार, २२ मार्च, २०१२
NP Complete
आपलं मन किती विचित्र असतं ना, लहान मुलासारखं. जे आपल्याजवळ नाही तेच नेमकं त्याला हवं असतं. म्हणजे त्याला सतत काहीतरी हवंच असतं. कधी गर्लफ्रेंड, कधी पैसा, कधी stability , तर कधी काही वेगळं. ही यादी कधीही न संपणारी आहे. पण कधी कधी आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा आपलं मन थकून जातं, खेळून दमलेल्या लहान मुलासारखं. मग अशा वेळी त्याला काहीही नको असतं. हवा असतो तो पाठीवरून फिरणारा मायेचा हात आणि थोडीशी विश्रांती, जेणेकरून ते पुन्हा धावायला सज्ज होईल. आणि अशा क्षणीच realise होतं कि हि सगळी धावपळ कशासाठी, नेमकं कशाच्या मागे जात आहोत आपण हेच आपल्याला माहिती नाही. मला जेव्हा मला आयुष्यात नेमकं काय हवंय असा प्रश्न पडतो तेव्हा माझ्याकडे एकच उत्तर असतं- समाधान. पण ते कसं मिळेल हेच माहिती नसतं. सगळ्यांचं असंच असतं बहुतेक. computer science च्या भाषेत असल्या प्रोब्लेम्सना NP complete प्रोब्लेम्स म्हणतात. आयुष्यात असे बरेच NP complete प्रॉब्लेम्स असतात. काळाच्या ओघात आपल्याला त्यांची उत्तरंही मिळत जातात. पण आयुष्यातले सगळेच प्रश्न सोडवायचे नसतात. काही सोडून द्यायचे असतात. कारण आयुष्य म्हणजे फक्त प्रश्नांची उत्तरं देणं नव्हे तर कोणते प्रश्न सोडवायचे आणि कोणते सोडून द्यायचे हे शिकणं होय.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)