जग हे कृष्ण आणि धवल असं विभागता नाही येत. करड्या रंगाच्या छटा असतात जिकडे तिकडे. काही कळ्याकडे झुकणाऱ्या तर काही पांढऱ्याकडे. प्रत्येकीत थोडासा कृष्ण आणि थोडासा धवल रंग असतोच. आपणही असेच मध्ये कुठल्या एखाद्या छाटेसारखे कृष्ण आणि धवल यांचं मिश्रण असतो. आपण कसे असतो ते पाहणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असतं. हे कळायला लागलं की बरेच पूर्वग्रह दूर होतात, नीरक्षीरविवेक ज्याला म्हणता तो दृष्टीमध्ये येतो.
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
बुधवार, १६ मार्च, २०१६
सोमवार, १४ मार्च, २०१६
पांढरे निशाण जिंदाबाद
(एक जुनी पोस्ट … तशीच पडून होती… म्हटलं चला प्रकाशित करूया… हे यासाठी सांगितलं की हे वाचून बरेच जण मी आता डिप्रेस झालो असा निष्कर्ष काढतात. असो. )
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
काही नाही हो, चालू आहे कसंतरी रडत पडत जगणं. आयुष्यात असतंच काय वेगळं? रोजचं तेच ते. कधी ते चांगलं वाटतं, कधी रटाळ, तर कधी तेच बोजड वाटतं. आपण असे कोण लागून गेलो जेणेकरून आपल्या आयुष्यात काहीतरी एक्साईटींग घडेल. असंच असतं आयुष्य हे स्वीकारायला हवं. आयुष्याशी तह केला कि सगळं एकदम सोप्पं होऊन जातं. उगाच बंडखोरीच्या भानगडीत पडलं की ना स्वतःला चैन ना इतरांना. आपल्या मर्यादा ओळखल्या की अवास्तव अपेक्षांचे चटके बसत नाहीत. खरं म्हणजे केव्हा तरी एखादी वेळ येते जेव्हा मन बंडखोर होतं पण ती बंडखोरी नेहमीच परवडते असं नाही. एखाद्या वेळी हातीची शस्त्रे मुकाट्याने खाली ठेवली म्हणजे शांती मिळते. पांढरे निशाण जिंदाबाद.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)