जीवनात आपण नेहमी कशाच्या तरी शोधत असतो, पण ते नेमकं काय असतं हे आपल्यालाही ठाऊक नसतं. खरं तर अगदी सगळीकडे, म्हणजे चित्रपट, गाणी, कविता, साहित्य, नाती-गोती, सखे-सोबती वगैरे सगळ्यांमध्येच आपण आनंद शोधत असतो. यांपैकी काही ठिकाणी तो मिळतोसुद्धा. मुळात आनंद आपल्यातच असतो. पण बऱ्याच वेळा बाहेर शोधूनही कुठे न सापडल्याने आपण निराश होतो. आपल्याला एकदम मोठं काहीतरी मिळवायचं असतं, मोठ्या आनंदासाठी. आणि त्या मोठ्या आनंदाच्या शोधत कुठेतरी आपण छोट्या छोट्या गोष्टींतून मिळणाऱ्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो. आणि मृगजळाप्रमाणे तो मोठा मासा काही आपल्या गळाला लागत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा