पृष्ठे

रविवार, १७ मे, २०२०

आत्मनिर्भरता

या एका शब्दाची सध्या खूप खिल्ली उडवली जात आहे. बऱ्याचदा  हे मोदी द्वेषातूनही होतंय हे वेगळं सांगायला नको. एखाद्या गोष्टीवर टीका करणे करणे चूक नाही पण त्यामागचा हेतू त्या टीकेचं गांभीर्य ठरवतो.  गमतीचा भाग सोडला तर आत्मनिर्भर होण्यात वाईट काय आहे?  आपल्या गरजांसाठी दुसऱ्यावर अवलंबून असणे ना व्यक्तीच्या हिताचे असते ना राष्ट्राच्या. व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत स्वावलंबन हेच सगळ्यांचं ध्येय असतं , असायला हवं आणि तसं नसेल तर प्रॉब्लेम आहे. आपण आज स्वावलंबी आहोत की नाही यापेक्षा आपण स्वावलंबी होण्याच्या वाटेवर आहोत की नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा