कुणी काहीही म्हणा या महामारीच्या निमित्ताने सरकारने लोकांच्या अधिकारांवर आणि एकूणच स्वातंत्र्यावर प्रचंड मर्यादा आणल्या आहेत आणि आता असं मर्यादित जगणं हाच नॉर्म होईल की काय ही भीती आहे. हे सगळं लोकांच्या आरोग्यासाठीच आहे असा युक्तिवाद होऊ शकतोही पण हे कुठपर्यंत आणि कधीपर्यंत हा प्रश्न शेवटी उरतोच. लॉकडाउनचं जितकं कौतुक व्हायचं तितकं झालं. इतर देशांच्या तुलनेत आपली परिस्थिती चांगली आहे म्हणता म्हणता कोरोनाच्या केसेस लाखावर गेल्या. अर्थव्यवस्थेचे बारा वाजले, लोकांची गैरसोय (खरं तर गैरसोय म्हणणं अंडरस्टेटमेंट असेल, मुस्कटदाबीच म्हणावी लागेल) झाली, देशाचं, समाजाचं वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान झालं, कित्येकांचं वैयक्तिक नुकसान झालं, होत आहे ते वेगळेच. म्हणजे तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी वेळ आलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा