खुर्ची म्हणजे काही निमंत्रण देऊन मिळालेला उपहार नसतो. खुर्चीबरोबर जसे अधिकार येतात तशीच किंबहुना त्यापेक्षाही जास्त कर्तव्येही येतात. खरं तर त्या कर्तव्यांच्या पूर्तीसाठीच खुर्चीला अधिकार बहाल केले जातात. ही कर्तव्ये करीत असताना चहूबाजूंनी टीका होणे अगदी साहजिकच आहे. प्रस्थापिताविरोधी जनतेचा सूरही स्वाभाविकच आहे. जे सत्ता उपभोगतात त्यांनी टीकेला तोंड द्यायची तयारी ठेवावी आणि आपल्या कामातूनच टीकाकारांना उत्तर द्यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा