पृष्ठे

बुधवार, ५ ऑगस्ट, २०१५

मनातल्या आशेला धुमारे फुटत असताना कुठेतरी शंकेची टिटवी किंचाळते आणि परत ते धुमारे करपून जातात आणि घोर निराशा होते. अकारण जशी आशा उगवते तशीच ती लुप्तसुद्धा होते. उसनं अवसान आणलं की असंच व्हायचं. खरं तर आता आनंदातही आनंदी व्हावं की नाही हेच कळेनासं झालंय. स्वतःच्याच आनंदाला स्वतःचीच नजर लागेल ही भीती वाटत असते. जसा क्षणात उन आणि क्षणात पाऊस असा उन पावसाचा खेळ असतो तसं झालंय आशा-निराशेचं, सुख-दुःखाचं. या क्षणीची आशा पुढच्या क्षणी घोर निराशेत रुपांतरीत होते. या क्षणी आनंदी झालं की पुढच्या क्षणी काहीतरी बिनसतं. काही एका गोष्टीसाठी आता आनंदी व्हावं आणि तीच गोष्ट पुढच्या क्षणी नाहीशी व्हावी असं काहीतरी चालू असतं आणि आपला भला मोठ्ठा पोपट होतो नियतीच्या हातून.

(आणि हो, हे वाचून कुणीही प्लीज काय झालं म्हणून विचारू नका राव. काही नाही झालं खरं तर. मी मस्त आहे, मजेत आहे. जरा प्रॉब्लेम चालू आहेत  आणि ते असतातच. मी असं काही लिहितो म्हणजे दिवसभर एकदम उदास वगैरे असतो असं काही नाही. कुठल्या तरी एखाद्या क्षणाचा उमाळा असतो असा. त्याचा असा शब्दंतून निचरा झाला की बरं वाटतं. जेव्हा मी काहीतरी लिहितो तेव्हा मी नॉर्मल आहे हे आसं समजा.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा