पृष्ठे

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०१५

आपल्या सुख-दुःखांचं, आपल्या अनुभवाचं जे काय कौतुक असतं ते फक्त आपल्यालाच असतं. इतरांना त्याची उब किंवा झळ कधीच पोहचत नाही आणि म्हणूनच त्यातला आनंद किंवा आगतिकता कधी जाणवत नाही. शेवटी त्या बऱ्यावाईट अनुभवातून जो धडा मिळतो त्याचे धनीही आपणच असतो. पण मग तरीही व्यक्त होण्याचा अट्टाहास असतोच आणि तो साहजिकच आहे. आपण ज्या परिस्थीचा सामना केलाय त्याबद्दल कुणीतरी आपली पाठ थोपटावी असं प्रत्येकाला वाटतं. त्याने काही होत नसलं तरीही पुढे अजून लढत राहायला बळ मिळतं. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा