आज समाजसुधाराक असल्याचा आव आणून समाजातल्या अनिष्ट गोष्टींवर बोलण्या/लिहिण्याऐवजी कुठल्या तरी धर्माला टार्गेट करून त्यावरच टीकेचा भडीमार करणाऱ्या समाजविदारकांची संख्या खूप वाढली आहे. म्हणजे वरवर पाहता हे खूप मोठे तत्त्वज्ञ किंवा विचारवंत असे भासतात पण समाजाला सुधारणे हा त्यांचा हेतू नसतो तर फक्त धर्माला नवे ठेवणे, त्यात दोष शोधणे, एखाद्या विभूतीचं वस्त्रहरण करणे असलाच हेतू असतो अन तेच उद्योग हे करत असतात. अनिष्ट रूढी, परंपरा यांना विरोध जरूर असावा. जे जे अनिष्ट आहे ते धर्माने त्यागावं आणि काळानुरूप बदलावं तरच तो धर्म टिकेल. पण केवळ अनिष्ट रुढींचा अंतर्भाव आहे म्हणून तो धर्मच वाईट ठरवणं हे कुठलं शहाणपण? पायात काटा घुसल्यावर काटा काढायचा कि पायच कापून टाकायचा? हे असले समाजविदारक म्हणजे पाय कापून टाकण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरसारखे आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा