(डोक्यावर भळभळणारी जखम आणि अमरत्वाचा शाप घेऊन मरणाची वाट बघणाऱ्या अश्वत्थाम्याची व्यथा. )
जगणं सरलं आयुष्य उरलं
मरणाची आता वाट बघतोय
दिवस सरला अंधार उरला
पसरत जाणारी रात बघतोय
तेल सरलं दिवा विझला
उरलेली मागे वात बघतोय
कर्तृत्व सरलं नशीब उरलं
आशेनं मोठ्या तळहात बघतोय
चुकलेल्या वाटांचं प्रतिबिंब पुन्हा
भळभळणाऱ्या घावात बघतोय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा