कुणी एक उठून दहशतवादाला भगवा रंग देतो आणि हिरव्याचा कैवारी असल्याचा
आव आणतो. कुणी दुसरा उठून आपल्या इतिहासात शिरतो आणि वाटेल तसा
गोंधळ घालतो. मग कुणी तिसरा उठून आमच्या श्रद्धा, आमची आराध्ये यांना
संकुचित ठरवू पाहतो. निकटच्याच काळात कदाचित या श्राद्धांनाही अंधश्रद्धा ठरवून
त्यांचंही निर्मुलन करण्याचा घाट एखाद्या तथाकथित 'पुरोगामी, उदारमतवादी,
धर्मनिरपेक्ष' व्यक्ती किंवा संघटनेने घातला तर नवल वाटायला नको. धर्मनिरपेक्षता
आणि धर्मविरोध यांच्यातला फरक न कळणारं किंवा तो कळूनही धर्माला
निवडणुकीतला एक्का बनवू इच्छिणारं नेतृत्व लाभल्यावर कसली अपेक्षा करणार?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा