पुन्हा एका फाशीच्या निमित्ताने मानवाधिकाराचा डंका वाजवणाऱ्यांना निमित्त मिळालंय. 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्राने तर अफझल गुरूला दिलेली फाशी कशी चुकीची आणि अन्यायकारक आहे यावरून लेखांचा भडीमार केला आहे. मागे कासाबच्या फाशीच्या वेळीही काही मानवाधिकाराच्या मक्तेदारांना भरून आलं होतं. आणि आता अफझल गुरूसाठी ह्यांची एकच रडारड कि त्याला प्रतीवादाची पुरेशी संधी नाही देण्यात आली, त्यावरचे आरोप सिद्ध करण्यासाठी वापरलेले पुरावे पुरेसे नव्हते, इत्यादी. यांच्या लेखी दहशतवादी तेवढेच मानव. त्यांच्यामुळे नाहक बळी गेलेल्यांच्या मानवाधिकाराचं काय? जेव्हा कसाबच्या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्या शेकडो निरपराध्यांचे प्राण घेऊन जात होत्या तेव्हा त्यांचा काय दोष होता? त्यांच्यावरचे कुठले आरोप सिद्ध झाले होते? भारताच्या संसदेवर हल्ला झाला तेव्हा तिथे ज्या सुरक्षारक्षक आणि जवान यांना हौतात्म्य आलं त्यांच्या जगण्याच्या मुलभुत अधिकाराचं काय? त्यांच्या कुटुंबावर जो प्रसंग ओढवला त्याचं काय? जेव्हा इथे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या करतात तेव्हा मानवाधिकाराच्या नवे ओरडणाऱ्या तथाकथित बुद्धीजीवींची दातखीळ बसते कि काय? काश्मीरमधील फुटीरवाद्यांच्या मानवाधिकारांची चिंता करणाऱ्यांना भारतीय सेनादलातील जवानांचे बलिदान दिसत नाही का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा