पृष्ठे

गुरुवार, २३ जुलै, २०२०

लॉकडाउन

एका बाजूला सांगत आहेत लॉकडाउन मेडिकल सुविधा वाढवण्यासाठी होतं. किती सुविधा वाढल्या? बरं इतके दिवस लॉकडाउन करूनही बऱ्याच ठिकाणी रुग्णांना बेड्स नाहीत म्हणून प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जावं लागत आहे आणि तिथल्या बिलांच्या कथा तर आपल्या कानी पडत आहेतच त्याबद्दल वेगळं सांगायला नको. दुसऱ्या बाजूला  केसेस वाढल्या म्हणून काही ठिकाणी सात, काही ठिकाणी तर अगदी दोन दिवस, तीन दिवस लॉकडाउन असाही पोरखेळ चालू आहे. दोन, तीन, सात दिवसांचा काय यांनी कोरोनाव्हायरससोबत करार केलाय का? कुठलं तर्कशास्त्र आहे यामागे? दिल्लीपासून गल्लीपर्यंत कुठेच नियोजन नाही, दूरदृष्टी नाही, सुसूत्रता नाही, संवेदनशीलता नाही. एका बाजूला कोरोनाचं अस्मानी संकट, दुसऱ्या बाजूला दूरदृष्टीच्या, नियोजनाच्या अभावामुळे, शासन-प्रशासनात बोकाळलेल्या भ्रष्टाचारामुळे उभं राहिलेलं सुलतानी संकट यांच्यामध्ये सामान्य माणूस भरडला जातोय. ही सगळी व्यवस्था ज्याच्यासाठी उभी आहे त्याचाच बळी याच व्यवस्थेकडून घेतला जातोय अगदी रोजच्या रोज. कोरोना व्हायरसच्या निमित्ताने आपली प्रशासन व्यवस्था किती कुचकामी आहे हे अधोरेखित झालंय आणि होतंय. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा