पृष्ठे

रविवार, १९ जुलै, २०२०

कोरोना - हे पाप कुणाच्या माथी मारायचं ?

कोरोनाचा प्रसार रोखण्यात आपल्याला सपशेल अपयश आलेलं आहे हे उघड सत्य आहे. आणि या अपयशात आपल्या सर्वांचाच (शासन, प्रशासन, जनता) वाटा आहे.  बहुतेक   वेळा "शासन तरी काय करणार?", "प्रशासन तरी काय करणार?", "अमेरिकेसारख्या देशाने हात टेकले तिथे आपली काय गत", "लोक ऐकतच नाहीत , उगाच बाहेर फिरतात" अशा कमेंट ऐकायला मिळतात. शासन, प्रशासन नाही तर मग कोण सोडवणार हा प्रश्न?   शासन आणि प्रशासन काय  फक्त लाल दिव्याच्या गाड्या घेऊन मिरवायला आहेत का ? अमेरिका किंवा इतर पाश्चात्य देश म्हणजे कुठले मापदंड आहेत का?  आणि लोकांचीही काही प्रमाणात चूक आहे हे मान्य पण लोक काही कारणासाठीच बाहेर पडत असतात. प्रत्येक ठिकाणी ओरड होते "लोक विनाकारण गर्दी करतात". पण आज बाहेर पडणारे आणि उद्या बाहेर पडणारे लोक वेगळे असू शकतात ना. लोकसंख्या विचारात घेऊन लॉकडाउन प्लॅन केलंय का? छोट्या-मोठ्या शहरांना, खेड्या पाड्यांना सरसकट एकाच नियमात कसं बसवता येईल? बऱ्याच ठिकाणी अंमलात आणला जात असलेला दिवसातून ठराविकच वेळेसाठी दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय अत्यंत मूर्खपणाचा वाटतो. त्या ठराविक वेळेत कोरोनाचा प्रसार होणार नाही याची शाश्वती कुणी दिली तुम्हांला? उलट यामुळे लोक पॅनिक होऊन गर्दी करू शकतात आणि तेच होतंय. जिल्हा, तालुका पातळीवर किती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले आहेत? किती अधिकाऱ्यांनी काय करता येईल याबाबत निवडक लोकांसोबत चर्चा केली आहे? प्रशासनाला दिलेले अधिकार जनतेची अडवणूक करण्यासाठी नव्हेत. प्रश्न सोडवायचा म्हटलं की मार्ग निघत जातात. पण इथे शासन आणि प्रशासनाच्या स्तरावर उदासीनता दिसते आणि उलट प्रश्न चिघळत ठेवण्यातच रस असल्याचं दिसतंय. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा