वादळातून बाहेर आल्यावर जेव्हा तुम्हांला वाटतं की आता तुम्ही कसल्याही वादळाला तोंड देऊ शकता तेव्हा त्यापेक्षाही मोठं वादळ नियती तुमच्या समोर आणून उभी करते. एक संपला की दुसरा प्रश्न तो संपला की तिसरा अशी प्रश्नांची मालीका, ते सोडवण्यासाठी तुमचा आटापिटा, त्यातून धडपडणारे आणि घडणारे तुम्ही आणि अधूनमधून येणारे काही निवांत क्षण. हेच लाईफ आहे. या सगळ्या संघर्षात Free Willचं काय असं बरेच जण विचारतात. पण तुमच्या आयुष्यात जे काही होतं त्यावर तुमचं नियंत्रण एका मर्यादेपलीकडे तुम्हांला हवं तितकं नसतं हेही नाकारून चालणार नाही. शेवटी आपण सारे आपल्यापेक्षाही भव्य आणि आपल्या दृष्टीने जवळपास अमर्याद अशा प्रवाहाचा भाग आहोत. त्यामुळे त्या प्रवाहाच्या दिशेने वाहणं हे अर्थातच क्रमप्राप्त आहे. बाकी आपण सगळेच प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत असतोच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा