दिवस म्हणजे युद्ध. रात्र म्हणजे युद्धविराम. राञ वैऱ्याची नसते. दिवसच वैरी असतो. राञ आपली असते. सूर्याबरोबरच अस्ताला जातो तो कलकलाट - बाहेरचा आणि मानतालाही. जगाचा रहाटगाडा काही काळ स्तब्ध होतो. अंधाऱ्या रात्री कधी घराबाहेर पडून पहा. दूर आकाशात शांतपणे मार्गस्थ असलेलं चंद्रबिंब, त्याला साथ करणाऱ्या चांदण्या, शांततेत बुडून गेलेला आसमंत, शांतपणाचा उपभोग घेणारी वेडीवाकडी तरीही डौलदार झाडे, निर्जन पसरलेला रास्ता, दूर कुठेतरी अस्तित्वासाठी फडफडत असलेली ट्यूब लाईट, दुरून कुठूनतरी या शांततेचा भंग करणारा कधी कुत्र्यांचा तर कधी किरकिऱयांचा अधूनमधून येणार आवाज हे सगळं आणि आपल्या मनातलं शमलेलं वादळ यांचं एक गूढ नातं आहे असं मला वाटतं आणि म्हणून मला राञ आपलीशी वाटते. रात्रीचा एकेक क्षण असा हातात धरून ठेवावासा वाटतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा