पृष्ठे

गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

स्वप्नं पाहायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. आपल्या मनात आपल्या भविष्याबद्दल एक इमेज असते जी खूप प्रॉमिसिंग आणि अपिलिंग असते. आपल्याला आपण तिथपर्यंत कसे जाऊ हे माहिती नसतं पण एक दिवस आपण तिथे पोहचू याची खात्री असते. पण जसजसा काळ जात  राहतो तसतसे आपण त्या भविष्याकडे तर सोडाच भलतीकडेच भरकटत चाललेलो असतो कारण ती इमेज आणि आपला आज यामधला जो गॅप आहे त्याचा विचारच आपण केलेला नसतो. कसेतरी म्हणजे नेमके कसे आपण तिथे पोहचणार आहोत यावर क्वचितच आपण विचार केलेला असतो.आणि मग काही काळानंतर आता स्वप्नं नुसती मनात ठेऊन नाही चालणार तर आपण त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी वेगाने पावले उचलण्याची गरज आहे याची जाणीव होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा