आजकाल कुणीही कशावरही भाष्य करू लागलाय. पत्रकारांना तर जगाच्या पाठीवरच्या सगळ्याच गोष्टींवर आपापले विचार मांडायचा परवानाच मिळालेला असतो. आणि ते त्यांचा हा हक्क अगदी इमाने इतबारे बजावत असतात. आपल्याला एखाद्या विषयातली माहिती असो अथवा नसो त्याबद्दल आपले मत असले पाहिजे आणि ते ठामपणे मांडले पाहिजे असे त्यांना वाटत असते. आता लोकसत्तामधला हा आजचा अग्रलेखच पहा. अतिशय उथळपणे, पुरेसा विचार न करता लिहिलेला अग्रलेख म्हणता येईल. यांच्या म्हणण्यानुसार 'आपण पाठवलेली संशोधन उपकरणे केवळ २५ किलो वजनाची आहेत आणि त्यामुळे आपण मंगळावर काही फार संशोधन करणार नाही आहोत आणि ही मोहीम म्हणजे आपण आपल्या हिमतीवर मंगळ मोहीम आखू शकतो हे जगाला दाखवणे हा आहे. आणि मंगळयान हे मंगळापासून सुमारे ३६० किमी अंतरावर असेल म्हणजे मुंबईत बसून रत्नागिरीचा अभ्यास केल्यासारखं आहे'. तर माननीय महोदय उपकरणांच्या वजनावरून त्यांच्या क्षमतेचा अंदाज करायला आपण कुठे शिकलात? आणि आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो अंतराळ मोहिमेत ३६० किमी हे अंतर म्हणजे फार जास्त नसतं, आपले उपग्रह हजारो किमी अंतरावर असतात आणि तिथूनसुद्धा ते हाय क्वालिटी फोटोज घेऊ शकतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा