बऱ्याच दीडशहाण्यांनी अतिशय उतावीळपणे आपण किती पुरोगामी आहोत हे सिद्ध करण्यासाठी डॉ. मेधा खोले यांच्याबद्दल आपापली मते मांडली आहेत. खोले बाई कशा चुकल्या हे सिद्ध करायची चढाओढ सोशल मीडियावर चालू होती मागच्या काही दिवसांत. त्या चूक की बरोबर हे लिहिणं हा हेतूच नाही माझा. मला इथं एवढंच म्हणायचंय की एखाद्याचं वैयक्तिक आयुष्य असं चव्हाट्यावर आणणं हे अतिशय चुकीचं आहे. भारतात विविध पोलीस स्टेशन्समध्ये दररोज लाखो तक्रारी दाखल होत असतील. त्या कधी अशा चव्हाट्यावर येत नाहीत आणि येऊही नयेत. आज जे खोले बाईसोबत होतंय ते उद्या तुमच्या आमच्या सोबत होऊ शकतं. कारण काहीही असू शकतं. उद्या तुमचं नाव असं नको त्या कारणासाठी सोशल मीडियावर चर्चिलं जाऊ लागलं तर काय वाटेल तुम्हाला? कुणाकुणाला स्पष्टीकरण देत बसणार? आणि कोण ऐकणार तुमचं? इथे लोकांची मते आधीच तयार असतात. What about right to privacy ? हे अतिशय भयानक आहे. सोशल मीडियावर बहुतेक गिधाडं टपलेली असतात. तुमच्या प्राव्हसीचे लचके तोडायला. तुम्ही आम्हीसुद्धा बहुतेक वेळा जाणतेअजाणतेपणे त्या गिधाडांपैकी एक असतो. हे थांबायला हवं. समाज म्हणून आपल्यात प्रगल्भता कधी येणार?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा