-----------------------------------------------
डायरीच्या पानातून (दि. १६ डिसेंबर २०१२)
-----------------------------------------------
सकाळी लवकर उठण्याच्या आमच्या मनसुब्याला आमच्या जागरणाने सुरुंग लागत आहे. कितीही उशिरा झोपलो तरीही आम्ही पाचचा गजर लावतो कारण झोपताना आमचा आमच्यावर पूर्ण विश्वास असतो. पण जसे आम्ही निद्रेच्या कवेत जातो तसे आम्ही आमचेही राहत नाही. मग कधी गजर वाजून वाजून कंटाळतो किंवा कधी आम्ही त्याचं तोंड बंद करतो. आणि परत आपल्या पोजमध्ये. आणि सकाळी वेळही जास्तच वेगाने धावायला लागतो. घड्याळात पहिले तर सात अन पाच मिनिटांनी उठून पाहतो तर आठ, अजून काही मिनिटे आणि साडेनऊ!!! मग काय पुन्हा एकदा पराभव. मग उद्या लवकर उठण्याचा निर्धार त्याच क्षणी होतो...अन त्या दिवसाचा रहाटगाडा चालू होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा