पृष्ठे

मंगळवार, २८ एप्रिल, २०१५

पण शब्द…

एक विचार मनात येतो
कविता होऊ पाहतो 
पण शब्द… 

एक भावना ओथम्बुन वाहते 
प्रकट होऊ पाहते 
पण शब्द… 

एक गहिवर गळ्यात दाटतो 
अश्रूंचा बंध फुटतो
पण शब्द… 

एक आनंद मनात साठतो 
अगदी गगनाला गाठतो 
पण शब्द… 

एक स्तब्धता मनात शिरते 
संध्याकाळ एकाकी उरते 
पण शब्द… 

पण शब्द 
हरवून जातात कुठेतरी 
नकळतच केव्हा 
किंवा नसतातच ते तिथे 
हवे असतात जेव्हा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा