पहाटेचे पाच साडेपाच वाजलेले आणि अजूनही पेंगत असलेलं हॉस्टेल आणि झोपेतच असलेली सृष्टी. अशा एकंदरीतच झोपाळू वातावरणात झोपेतून उठणं म्हणजे एक दिव्यच. पण एकदा का ते दिव्य पार पाडलं आणि जरा फेरफटका मारायला बाहेर पडलो कि नजरेस पडते ती एक प्रसन्न पावसाळी सकाळ; हिरव्या वनराईच्या कुशीत वसलेला आणि अजूनही निपचित पडलेला IIT मद्रासचा सुंदर कॅम्पस; रात्रीच्या पावसामुळे हवेत, रस्त्यांवर, झाडा-झुडुपांवर आणि एकूण एक गोष्टींवर पसरलेला ओलावा; रस्त्याच्या आजू बाजूला अगदी निर्भयपणे फिरणारी हरणं; झाडांवर उड्या मारणारी माकडं; jogging करणारे आमच्यासारखे अल्पसंख्यांक; त्यांना मध्ये मध्येच कुठेतरी साथ करणारी कुत्री; हवेची झुळूक आल्यावर पाण्याचा शिडकावा करणारी झाडं असं एकूणच प्रसन्न वातावरण.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा