शब्द आणि भावना- एक अभिव्यक्तीचं माध्यम तर दुसरं कारण. भाव भावना शब्दांशिवायही स्वतंत्रपणे अस्तित्वात असू शकतात. किंबहुना सगळ्याच भावना शब्दांमध्ये व्यक्त नाही करता येत. मग म्हणूनच आपण डोळ्यांतून, स्पर्शातून त्या व्यक्त करत असतो. पण शब्दांना मात्र ओलावा येतो तो भाव भावनांमुळेच. अन्यथा ते रुक्षच राहतात. सरकारी कागदपत्रांसारखे किंवा गणित, विज्ञान इत्यादी शास्त्रांसारखे. म्हणूनच कि काय शाळेत भाषा विषय तेवढे जरा जास्त आवडायचे मला.
मुळातच माणूस (किंवा कोणताही सजीव घ्या) भावनिक असतो. फक्त कुणी जरा जास्त व्यक्त करतं कुणी कमी एवढंच. पण भावनाहीन होणं हे कुणालाही कधीच शक्य नाही. आणि गीतेत सांगितलेल्या स्थितप्रज्ञ या संकल्पनेची गल्लत आपण बहुतांशी भावनाहीन असण्याशी करतो. केवळ सुख किंवा दुःख याच भावना आहेत असं नाही. त्या कधी कधी खूप गुंतागुंतीच्या असतात. आणि प्रत्येकाची त्या व्यक्त करण्याची रीतही वेगवेगळी असते.....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा