कधी कधी खूप कंटाळा येतो- जगण्याचा, अस्तित्वाचा. आपलं अस्तित्वच एक ओझं वाटायला लागतं. खूप थकल्यासारखं वाटतं. ही नसती उठाठेव कशासाठी चाललीय, इतकं अवघड आहे जगणं, मनासारखं कधीतरी जगता येईल कि नाही असं वाटतं. जगणं -अगदी साधी आणि सरळ गोष्ट. पण आपला हव्यास (ज्याला आपण महत्त्वाकांक्षा असं गोन्डस नाव देतो), आपले egos आपलं जगणं अगदी complex करून टाकतात. किंबहुना ते जगणं उरतच नाही, practical असण्याच्या नावाखाली ती तडजोड असते आनंदाशी, आनंदी असण्याशी आणि ती कशासाठी तर आनंदासाठीच. हे म्हणजे मृगजळासारखं आहे. आपण त्याच्या जवळ जाईपर्यंत ते अजूनच पुढे गेलेलं असतं. आणि ते मिळवण्यातच आनंद आहे असा आपला ग्रह आपण करून घेतलेला असतो. आणि मग काय त्याच्यामागे धावण्याशिवाय पर्याय उरत नाही. खरा आनंद कशात आहे हे आपण विसरूनच जातो. मला आठवतं लहानपणी अगदी छोट्या छोट्या गोष्टींतही आनंद असायचा. पण जसजसा मोठा होत गेलो तसतसा छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंदही कमी होत गेला आणि आनंदाची व्याख्याच आता बदललीय. असं करून आपण आपल्यालाच आनंदापासून दूर नेतोय हे कळत नाही असं नाही. पण आता आपला इगो आपल्याला परत जाऊ देत नाही. तू हे मिळवलंस आता तुला हे मिळवायचंय असं आपण स्वतःला बजावत असतो. मला एवढ्या पगाराचा, असल्या प्रोफाईलचा जॉब मिळवायचाय. "तुम्ही गरीब म्हणून जन्मलात यात तुमचा काही दोष नाही पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो तुमचा दोष आहे" ही असते आपली ideology. पण "का, कशासाठी" असा साधा प्रश्नही आपण स्वतःला कधी विचारात नाही. मान्य आहे पैसा कमावलाच पाहिजे. ते आवश्यक पण आहे. पण कोणती किंमत देऊन? साध्य देऊन साधन घेतल्यासारख झालं हे , नाही का?
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
रविवार, २७ मे, २०१२
नसती उठाठेव
कधी कधी खूप कंटाळा येतो- जगण्याचा, अस्तित्वाचा. आपलं अस्तित्वच एक ओझं वाटायला लागतं. खूप थकल्यासारखं वाटतं. ही नसती उठाठेव कशासाठी चाललीय, इतकं अवघड आहे जगणं, मनासारखं कधीतरी जगता येईल कि नाही असं वाटतं. जगणं -अगदी साधी आणि सरळ गोष्ट. पण आपला हव्यास (ज्याला आपण महत्त्वाकांक्षा असं गोन्डस नाव देतो), आपले egos आपलं जगणं अगदी complex करून टाकतात. किंबहुना ते जगणं उरतच नाही, practical असण्याच्या नावाखाली ती तडजोड असते आनंदाशी, आनंदी असण्याशी आणि ती कशासाठी तर आनंदासाठीच. हे म्हणजे मृगजळासारखं आहे. आपण त्याच्या जवळ जाईपर्यंत ते अजूनच पुढे गेलेलं असतं. आणि ते मिळवण्यातच आनंद आहे असा आपला ग्रह आपण करून घेतलेला असतो. आणि मग काय त्याच्यामागे धावण्याशिवाय पर्याय उरत नाही. खरा आनंद कशात आहे हे आपण विसरूनच जातो. मला आठवतं लहानपणी अगदी छोट्या छोट्या गोष्टींतही आनंद असायचा. पण जसजसा मोठा होत गेलो तसतसा छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंदही कमी होत गेला आणि आनंदाची व्याख्याच आता बदललीय. असं करून आपण आपल्यालाच आनंदापासून दूर नेतोय हे कळत नाही असं नाही. पण आता आपला इगो आपल्याला परत जाऊ देत नाही. तू हे मिळवलंस आता तुला हे मिळवायचंय असं आपण स्वतःला बजावत असतो. मला एवढ्या पगाराचा, असल्या प्रोफाईलचा जॉब मिळवायचाय. "तुम्ही गरीब म्हणून जन्मलात यात तुमचा काही दोष नाही पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो तुमचा दोष आहे" ही असते आपली ideology. पण "का, कशासाठी" असा साधा प्रश्नही आपण स्वतःला कधी विचारात नाही. मान्य आहे पैसा कमावलाच पाहिजे. ते आवश्यक पण आहे. पण कोणती किंमत देऊन? साध्य देऊन साधन घेतल्यासारख झालं हे , नाही का?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा