तिकडे महाराष्ट्रात 'शाळा' रिलीज झालाय. मला इकडे चेन्नईमध्ये तो कधी पाहायला भेटेल ते माहिती नाही. तसं मी शाळा हि कादंबरी वाचली आहे साधारणपाने दोन वर्षांपूर्वी. मस्त आहे खूप. आता नेटवर 'शाळा'चे reviews पाहून परत कादंबरीची आणि मग अर्थातच माझ्या शाळेची आठवण झाली. खरं तर हि कादंबरी वाचणाऱ्या प्रत्येकालाच त्याच्या शाळेची आठवण होतेच. आणि मग आपण आपल्या नववीच्या वर्गात जातो. मग आपल्याला परत भेटतात 'सुऱ्या', 'चित्र्या','फावड्या' वगैरे मित्र मंडळी. आणि हो त्या आपल्या वर्गात असणारी 'शिरोडकर'सुद्धा. त्यांची नवे हि काहीही असोत, हि मंडळी थोड्या फार फरकाने सर्वांच्याच आयुष्यात आलेली असतात. आणि आपलीहि गोष्ट थोड्या फार फरकाने 'जोश्या'सारखीच असते, नाही का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा