स्वप्नं पाहायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. आपल्या मनात आपल्या भविष्याबद्दल एक इमेज असते जी खूप प्रॉमिसिंग आणि अपिलिंग असते. आपल्याला आपण तिथपर्यंत कसे जाऊ हे माहिती नसतं पण एक दिवस आपण तिथे पोहचू याची खात्री असते. पण जसजसा काळ जात राहतो तसतसे आपण त्या भविष्याकडे तर सोडाच भलतीकडेच भरकटत चाललेलो असतो कारण ती इमेज आणि आपला आज यामधला जो गॅप आहे त्याचा विचारच आपण केलेला नसतो. कसेतरी म्हणजे नेमके कसे आपण तिथे पोहचणार आहोत यावर क्वचितच आपण विचार केलेला असतो.आणि मग काही काळानंतर आता स्वप्नं नुसती मनात ठेऊन नाही चालणार तर आपण त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी वेगाने पावले उचलण्याची गरज आहे याची जाणीव होते.
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
गुरुवार, ९ जानेवारी, २०२०
शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९
Believe it or not it is the media that is developing your perception. You do not see what is but rather you see what 'they' want you to see. Sadly there are not many of 'them' who want you to see the truth as it is but the side of it that 'they' like or 'they' just design the whole new truth of 'their' convenience for you. And the worst part is that we are very rigid on our opinions driven by our perceptions. Once we have our sides (right, left, centre, leaning here or there, nowhere, etc.) all we see is the colour that we want to see. It is by our collective nature that we jumpt to conclusions where we must wait to see how things take turn.
बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९
सगळं किती बदललंय
सगळं किती बदललंय ही भावना स्थलकाल दोन्हीसापेक्ष युनिव्हर्सल आहे. अगदी सगळ्यांना सदैव असंच वाटत असतं. काही प्रमाणात त्यात तथ्यही असतं. पण सगळं बदललंय यापेक्षा पूर्वी सगळं किती छान होतं याकडे लक्ष वेधण्याचा तो एक केविलवाणा प्रयत्न असतो. माणसाला मुळात खंत असते ती हातून निसटलेल्या वेळेची.
बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८
जय भवानी जय शिवाजी
मागच्या पाच दहा वर्षात 'जय भवानी जय शिवाजी'ची जागा 'जय जिजाऊ जय शिवराय' या घोषणेने घेतली. भवानी मातेला अतिशय शिताफीने बाजूला केलं गेलंय. गुढी पाडव्याला गुढ्या उभारणं सोडून आपण पताका उभारू लागलो. बहुजन प्रतिपालक शिवाजी म्हणताना गोब्राम्हण प्रतिपालक शिवाजी महाराज कुठेतरी हरवत गेले. गोब्राम्हण प्रतिपालक शिवाजी महाराजांनासुद्धा भवानी मातेप्रमाणेच पद्धतशीरपणे बाजूला सरण्यात आलंय कारण ते सोयीचं नाही. देव्हाऱ्यातून देवी देवता जाऊन शिवाजी महाराज आणि जिजाऊंनी त्यांची जागा घेतली. जिजाऊ आणि शिवराय हे आम्हांला सर्वदा वंदनीयच. पण आम्ही त्यांना विभूती करून त्यांचा माणूस असण्याचा अधिकार नाकारला आहे. याउपर आपली प्रतीके अशी बाजूला सारून आम्ही आपल्याच मुळावर घाव घालत आहोत. बदल वगैरे मान्य आहे हो पण तो स्वयंस्फूर्त असायला हवा. पद्धतशीरपणे केली जातात ती कारस्थाने.
रविवार, २१ जानेवारी, २०१८
गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७
एखादा दिवस किंवा काही तास आपण ठरवून वाया घालवतो. मागचे तीन चार तास मी तसंच करतोय. बरं वाटतं असं करायला अधूनमधून. त्याचं असं आहे की लहानपणापासून आपलं मन एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून गिल्टी वाटून घेण्यासाठी प्रोग्राम केलं गेलंय. वेळ वाया घालवणं ही त्यातलीच एक गोष्ट. त्यामुळे असं ठरवून वेळ वाया घालवणं म्हणजे एक प्रकारची बंडखोरीच, नाही का? पण तीमध्ये वेगळीच मजा आहे, उन्माद आहे.
बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७
मुलगा: तुमच्या या साठ-पासष्ट वर्षांच्या आयुष्यात तुम्हांला देव वगैरे नसतं हे अजून कसं रिअलाईझ नाही झालं?
वडील: देव नाही ही फार टोकाची आणि उतावीळ भूमिका झाली. पण ठीक आहे. ते तुझं सध्याचं मत आहे. मतं बदलू शकतात. असो... आणि देव नाही हे रिअलाईझ झालं म्हणण्यापेक्षा तसं वाटलं मला कैक वेळेस असं मी म्हणेल. पण आपल्या जाणिवांचा आवाका किती? आणि अजून म्हणजे असा विचार करणारी तुमचीच पिढी काही पहिली नाही. आम्हीसुद्धा जमेल तेवढा विद्रोह केलाय प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध, रूढी-परंपरांविरुद्ध. आपापल्या कुवतीनुसार सगळेच तसं करत असतात. एका पिढीच्या श्रद्धांचं आणि समजुतींचं ओझं पुढच्या पिढ्यांना नेहमीच होत असतं. पण आयुष्य हे असं बंडखोरी करून नाही चालत हे काही काळानंतर कळायला लागतं. आयुष्याचा गाडा चालण्यासाठी पाय कुठेतरी टेकावे लागतात. मनाला एक आधार लागतो. प्रत्येक जीवाला आणि विशेषतः माणसाला निसर्गतःच शाश्वताची ओढ असते आणि ती आपल्या श्रद्धांमध्ये रूपांतरित होत असते. देव आहे कि नाही यापेक्षा मला तो हवाय इतकंच मी जाणतो. आपल्या जाणीवे-नेणिवेच्याही पलीकडे एक शक्ती आहे हा विश्वास मला जगण्याचं बळ देतो. जीवन म्हणजे काही अराजक नाही किंबहुना ते नसावं असं मला वाटतं आणि त्यासाठी श्रद्धेचा आधार लागतो. जेव्हा अंगातलं त्राण कमी होत जातं तेव्हा ही श्रद्धाच आशेचा किरण असते. आता तू तरुण आहेस. आपल्यासमोर अफाट आयुष्य पडलंय असं तुला वाटत असेल. पण एकदा हि जीवनाची गाडी उताराला लागली की अस्तित्वाचं ते टोक दिसायला लागतं आणि ते फार दूर नाही हे लक्षात घे. ते एकदा नजरेच्या टप्प्यात आलं की सगळंच गौण ठरतं. फक्त उरते ती श्रद्धा. आंधळी असेल कदाचित पण म्हणून ती वाईट असं मुळीच नाही. कशावर विश्वास ठेवायचा कशावर नाही हे तुझं तू ठरव. पण जगण्याची उर्मी कमी होऊ नये एवढं पहा म्हणजे झालं.
बुधवार, ४ ऑक्टोबर, २०१७
गरज
आयुष्य म्हणजे गरजांची रांग आणि त्या पूर्ण करण्यासाठीचा आटापिटा. एक गरज पूर्ण होत नाही तोवर दुसरी उभी राहते. गरजा आपल्यापेक्षा एक पाऊल पुढेच असतात, नेहमीच. या गरजांचं रूपांतर कधी हव्यासात होतं लक्षातच येत नाही आणि मग सुरु होते जीवघेणी धावपळ. हे सगळं कळत असतं पण इलाज नसतो प्रवाहासोबत वाहत जाण्याशिवाय.
बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७
बऱ्याच दीडशहाण्यांनी अतिशय उतावीळपणे आपण किती पुरोगामी आहोत हे सिद्ध करण्यासाठी डॉ. मेधा खोले यांच्याबद्दल आपापली मते मांडली आहेत. खोले बाई कशा चुकल्या हे सिद्ध करायची चढाओढ सोशल मीडियावर चालू होती मागच्या काही दिवसांत. त्या चूक की बरोबर हे लिहिणं हा हेतूच नाही माझा. मला इथं एवढंच म्हणायचंय की एखाद्याचं वैयक्तिक आयुष्य असं चव्हाट्यावर आणणं हे अतिशय चुकीचं आहे. भारतात विविध पोलीस स्टेशन्समध्ये दररोज लाखो तक्रारी दाखल होत असतील. त्या कधी अशा चव्हाट्यावर येत नाहीत आणि येऊही नयेत. आज जे खोले बाईसोबत होतंय ते उद्या तुमच्या आमच्या सोबत होऊ शकतं. कारण काहीही असू शकतं. उद्या तुमचं नाव असं नको त्या कारणासाठी सोशल मीडियावर चर्चिलं जाऊ लागलं तर काय वाटेल तुम्हाला? कुणाकुणाला स्पष्टीकरण देत बसणार? आणि कोण ऐकणार तुमचं? इथे लोकांची मते आधीच तयार असतात. What about right to privacy ? हे अतिशय भयानक आहे. सोशल मीडियावर बहुतेक गिधाडं टपलेली असतात. तुमच्या प्राव्हसीचे लचके तोडायला. तुम्ही आम्हीसुद्धा बहुतेक वेळा जाणतेअजाणतेपणे त्या गिधाडांपैकी एक असतो. हे थांबायला हवं. समाज म्हणून आपल्यात प्रगल्भता कधी येणार?
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
